राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री-पदाची शपथ घेतली.यावरून राज्यातील कार्यकर्ते संभ्रमात आहे.पुणे,सोलापूर,छ.संभाजीनगर,नागपुरातही अजित पवार यांचे समर्थक ‘नॉट रिचेबल असून काहींनी फोनवर प्रतिसाद दिला नाही.माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे नमूद केल्याने शहरातील पक्ष नेत्यांत फूट पडल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी थेट शरद पवारांविरोधात थेट बंड करून रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादीत मोठा बदल झाल्याचे दिसत आहे. जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि प्रतोपदी नियुक्ती केली. या नियुक्तीवरून आता शिंदे गटाचे नेते प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला.
म्हस्के यांनी सांगितलं की, जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्ष म्हणून निवड झाली असेल तर माझ्याकडून आणि आमच्या पक्षाकडुन त्यांना शुभेच्छा. मात्र, विरोधी पक्ष नेता निवडण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो.आता पवार साहेबांनीही त्यांच्या मुलाखतीत तेच सांगितलं.सर्व आमदार आपल्या सोबत असल्याचं अजित पवारही सांगत आहेत. प्रफुल्ल पटेलही तेच म्हणाले की, सर्व आमदार आमच्या सोबत आहे. मग जो पक्ष सत्तेत आहे, ज्या पक्षाचा उपमुख्यमंत्री आहे, त्या पक्षाचा उमेवार विरोधी पक्षनेता कसा होऊ शकतो? असा सवाल म्हस्के यांनी केला.
नरेश म्हस्के पुढे बोलताना म्हणाले जितेंद्र आव्हाड हे अजित पवार कधी एकदा भाजपमध्ये जातात आणि मला विरोधी पक्षनेतेपद मिळतं याचीच जणू वाट पाहून होते. हे म्हणजे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असा टोला लगावला.आज पत्रकार परिषदेत आव्हाडांनी शरद पवारांचा उल्लेख म्हाथारा असा उल्लेख केल्याची टीकाही त्यांनी केली.
राज्यात अजित पवारांच्या शपथविधीनंतर संजय राऊत यांनी शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होतील परिणामी सत्ता हातून जाईल या भीतीने भाजपने नवा मित्र शोधला.या घडामोडींमुळं मुख्यमंत्री नाराज असल्याचं राऊत म्हणाले अश्या वल्गना करायला राऊतांनी सुरुवात केली आहे.नरेश म्हस्के म्हणाले मुख्यमंत्री नाराज नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं नाट्य झालं 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती म्हणून निवडणूक लढवली. लोकांनी युतीला कौल दिला. पण आपल्याला सत्ता चालवता यावी यासाठी पवारांना एक बूजगावण हवं होत.पदाच्या लालसेपायी ठाकरे कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत गेले. नंतर शिवसेनेत फुट पडली.संजय राऊत यांच्यामुळं ठाकरे गटाचा क्लिनबोल्ड झाला.त्यांनी ज्यांच्या नादी लागून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची वाट लावली त्या शरद पवारांचाही राऊतांनी क्लिनबोल्ड केला. करावे तसे भरावे, ही म्हण शरद पवारांना तंतोतंद लागू होते. शरद पवारांनी शिवसेनेची जी दशा केली त्याचं फळ त्यांना मिळाल्याचं म्हस्के म्हणाले आहेत.
