राज्याच्या राजकारणात कालपासून अनपेक्षित घडामोडी घडत असून, अजित पवार यांनी अचानकपणे भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी 8 राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. दरम्यान, या घडामोडीनंतर भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे. अजून छोटे-मोठे भूकंप होत राहतील कोण-कोण एकट पडेल ते पाहत राहा, असे वक्तव्य महाजन यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी काही घडामोडी घडण्याचा अंदाज लावला जात आहे.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर इतर आठ राष्ट्रवादी आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या राजकीय भूकंपानंतर भाजपच्या बड्या नेत्यानं मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात मोठे राजकीय हादरे जाणवायला सुरुवात झाली आहे.राज्यातील राजकारणात झालेल्या भूकंपावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठा इशारा दिला आहे. ते म्हणाले, ‘अजित पवार यांचे स्वागत आहे. देशाचे नेतृत्व फक्त मोदी करू शकतात हे त्यांना मान्य आहे. अजून छोटे-मोठे भूकंप होत राहतील. कोण-कोण एकटं पडेल ते पाहत राहा.’
आता पुढे बघा काय काय होतं कोण-कोण एकटं पडतं ते बघा. उद्धव ठाकरे यांच्यासोबत किती लोक राहतील हा मोठा प्रश्न आहे. राज्यामध्ये असे छोटे मोठे भूकंप होत राहणार आहेत. यामुळे बघावं लागेल कोण कोणासोबत राहत राष्ट्रवादीमध्ये कोण राहील आणि शिवसेनेत कोण राहील, हा देखील संशोधनाचा विषय राहिल, असं देखील मंत्री गिरीश महाजन म्हणाले. तसेच रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार देखील लवकरच होणार आहे.
