यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. पुण्यातील सप महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पंतप्रधान मोदी यांना खास उपरणे, पुणेरी पगडी, सन्मान पत्र आणि एक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. तसेच या पुरस्कार सोहळ्यासाठी लोकमान्य टिळक वापरायचे तसंच खास उपरणं मोदी यांना देण्यात आलं.टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकमान्य टिळक पुरस्कारात एक लाख रूपयांची रक्कम दिली जाते. ही रक्कम पंतप्रधानांच्या सुचनेप्रमाणे नमामी गंगे प्रकल्पासाठी देण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तेव्हा टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना मराठीतून भाषणाची सुरुवात केली. लोकमान्य टिळकांना मी कोटी कोटी वंदन करतो, असं मोदी म्हणाले.
पंतप्रधानांची या पुरस्कारासाठी का निवड करण्यात याबाबत सांगताना दीपक टिळक म्हणाले, “लोकमान्यांनी यावेळी सर्व विश्वस्त चर्चेसाठी एकत्र आले तर आमच्यासमोर एकच नाव आलं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. कारण लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र, आधुनिक, बलाढ्य हिंदुस्थानचं स्वप्न पाहिलं होतं. राष्ट्रीयत्व, हिंदुस्तानची पुरातन विद्या, वैभवशाली इतिहास, राष्ट्रप्रेम स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, स्वदेशी अर्थकारण लोकमान्यांनी सांगितलं होतं. तेच सूत्र मोदींच्या लोककल्याणकारी बलाढ्य राष्ट्राच्या मागे आहे.
