अवकाळीमुळे प्रदूषणापासून दिलासा! मुंबई, पुण्यातील हवेची गुणवत्ता पातळी सुधारली

मुंबई आणि पुण्यात गेल्या काही दिवसांपासूंन हवा गुंतवत्ता निर्देशांक हा सातत्याने ढासळत होता. प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. दरम्यान, काल झालेल्या पावसामुळे दोन्ही शहरातील प्रदूषणाची पातली खालवली आहे. यामुळे दिलासा मिळाला आहे.

मुंबई आणि पुण्यात प्रदूषणाचा प्रश्न हा गंभीर बनला आहे. वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. नागरिकांना श्वसनाचे आजार होऊ लागले होते. या वाढत्या प्रदूषणामुळे राज्य सरकारने काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विशेष नियमावली देखील जाहीर केली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री मुंबई आणि पुण्यात झालेल्या पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली असून प्रदूषण कमी झाल्याचे पहायला मिळाले.

उल्हासनगरने प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईलादेखील मागे टाकले आहे. मुंबईची हवेचा गुणवत्ता घसरली असताना उल्हासनगर येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा गुरुवारी २०० च्या वर गेला होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर ही नोंद करण्यात आली होती. प्रदूषणाच्या बाबतीत उल्हासनगरने मुंबईलादेखील मागे टाकले होते. यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

दिल्लीत रात्रभर पडलेल्या पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली –

दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र च्या इतर आसपासच्या भागात गुरुवार आणि शुक्रवारी मध्यरात्री हलका पाऊस पडला, ज्यामुळे विषारी हवेपासून आराम मिळाला. कर्तव्य पथ, ITO आणि दिल्ली-नोएडा सीमेवरील दृश्यांमध्ये हलक्या ते मध्यम तीव्रतेच्या पावसाच्या सरी दिसल्या, ज्यामुळे हवामानात अचानक बदल झाला.

हिमालयाच्या प्रदेशापासून हरियाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांपर्यंत सध्या संपूर्ण वायव्य भारतात ढगांचा पांढरा ठिपका पसरलेला आहे. सक्रिय पश्चिमी विक्षोभ हे ढगांच्या आच्छादनामागील कारण आहे ज्यामुळे आज संध्याकाळपर्यंत मैदानी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे हवेचा दर्जा हा सुधारण्यास मदत होण्याची शक्यता आहे.