महाविकास आघाडीचं राज्यात काही खरं दिसत नाही; जागावाटपावरून दररोज नेते भांडतायेत – गिरीश महाजन

ठाकरे गटाचा मोठा नेता बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत असतानाच दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडून मोठं वक्तव्य करण्यात आले आहे. आगामी काही दिवसांत इतर पक्षातील अनेक मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे महाजन म्हणाले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अनेकजण भाजपमध्ये येण्याची शक्यता शक्यता देखील महाजन यांनी व्यक्त केली आहे.

ठाकरे गटाने नुकतीच त्यांच्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. यानंतर महाविकास आघाडीत सुरू झालेल्या कुरबुरी आता चव्हाच्यावर आलेल्या आहेत. त्यांच्यातील याच वादावरून आता भाजपच्या वरिष्ठ नेत्याने मविआवर टोला लगावला आहे. ‘राज्यात महाविकास आघाडीचं काही खरं दिसत नाही’, असं म्हणत भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी टीका केली.

‘ही जागा मला, ती जागा मला यावरून महाविकास आघाडीमध्ये नेत्याचे रोज वाद सुरू आहेत, त्यांचे नेते दररोज भांडताहेत. महाविकास आघाडीचं राज्यात काही खरं नाही ‘ अशी टीका महाजन यांनी केली. खरी शिवसेना ही आपल्याकडे आहे, खरी राष्ट्रवादी ही पूर्ण आपल्याकडे आलेली आहे. पाच-सात लोकं कुठे शरद पवार साहेबांच्याकडे तर पाच सात आमदार हे उद्धव ठाकरे साहेबांकडे राहिलेले आहेत. ही जागा मला ती जागा मला यावरून महाविकास आघाडीमध्ये नेत्याचे रोज वाद सुरू आहेत, नेत्यांची रोजच्या रोज भांडणं होत आहेत. त्यांची युती आज तुटेल की उद्या, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे . त्यामुळे यादेशांमध्ये राज्यांमध्ये अनुकूल परिस्थिती ही भारतीय जनता पक्षाला आहे,’ असं म्हणत गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.