बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या रविवारी मुळशी तालुक्यातील प्रचार दौऱ्यात होत्या. या दौऱ्यात ताथवडे येथेही त्यांनी भेट दिली. सुनेत्रा पवार ताथवडे येथे येणार म्हणून माजी खासदार विदुरा तथा नानासाहेब नवले हेही त्यांच्या ताथवडेतील निवासस्थानी आले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांनी घरात पाऊल टाकताच नानासाहेब नवले म्हणाले “यु आर वन ऑफ द बेस्ट डॉटर इन लॉ”
काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनीही नानासाहेब नवले यांची त्यांच्या पुण्याच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपला पाठिंबा सुनेत्रा पवार यांना दिला होता. आता शाब्बास सूनबाई म्हणत सर्वात सरस सून असल्याचे दिलेले प्रशस्तीपत्र महत्वाची घटना मानली जात आहे. दरम्यान, नानासाहेब नवले यांची नातसून जान्हवी सूमेश नवले यांनी नुकतेच यूपीएसीमध्ये यश प्राप्त केले. त्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी जान्हवी यांचे कौतुक करत नवले कुटुंबीयांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक आहे, असे वक्तव्य केले होते. यावरून राज्यात मोठी खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शरद पवारांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला होता. त्यानंतर शरद पवारांनी आपण तसे बोललो नाही, आपला उद्देश तसा नव्हता. आपल्या म्हणण्याचा गैर अर्थ काढला, असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, नानासाहेब नवले यांची नातसून जान्हवी सूमेश नवले यांनी नुकतेच यूपीएससी मधे यश प्राप्त केले. त्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी जान्हवी यांचे कौतुक करत नवले कुटुंबीयांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
