पुणे शहरात मेट्रोचे दोन मार्ग सुरु झाले आहेत. नेहमी वाहतूक कोडींत अडकणारे पुणेकर मेट्रो प्रवाशाला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. पुणेकर मेट्रोने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. पुणे मेट्रो सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो धावत आहेत. पुणेकरांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे मेट्रो प्रशासनही नवनवीन सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पुणे मेट्रोने दैनंदिन पासची सुविधा निर्माण केली आहे. त्यानुसार दिवसभरात केवळ शंभर रुपयांत दोन्ही मार्गांवर अमर्यादीत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे पुण्यातून पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवडमधून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची चांगली सुविधा होणार आहे.
मेट्रोने दर महिन्याला लाखो पुणेकर प्रवास करत आहेत. मार्च महिन्यात २२ लाखांपेक्षा जास्त लोकांनी मेट्रोने प्रवास केला. पिंपरी- चिंचवडमधून पुणे स्टेशन, येरवडा, वनाजपर्यंत मेट्रोने जात येते. या मार्गावर रस्ते मार्गाने जाताना तास, दोन तासांचा वेळ जातो. परंतु मेट्रोने जवळपास अर्धा तासांत प्रवास होते. यामुळे मेट्रोने प्रवास करण्यास पुणेकर प्राधान्य देऊ लागले आहे. त्यामुळे मेट्रोकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीट सुविधा, अॅप, मेट्रो स्थानकावर मशीनच्या माध्यमातून तिकीट दिले जात आहे.
मेट्रो प्रशासन आपल्या प्रवाशांना स्मार्ट कार्ड, मासिक पास देत आहे. यातील दैनंदिन पासच्या सुविधामुळे प्रवासी शंभर रुपयांमध्ये मेट्रोने अमर्यात प्रवास करू शकतात. यामुळे प्रवाशांच्या पैशांमध्ये मोठी बचत होत आहे. खास गोष्ट म्हणजे, हे पास मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर वापरता येत आहेत. कोणताही प्रवासी दैनंदिन शंभर रुपयाचा ६ सकाळी ते रात्री १० वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत वापरू शकतो. त्यानंतर दुसऱ्या दिवसासाठी त्याला वेगळा पास काढावा लागतो.
पासवर कोणतीही सूट नाही –
मेट्रो प्रशासनाने या पासची किंमत प्रति व्यक्ती१०० रुपये निश्चित केली आहे. एकदा हा पास घेतला की तो परत करता येत नाही. तसेच, सर्व लोकांसाठी या पासची किंमत १०० रुपयेच आहे. हा पास खरेदी केल्यानंतर त्या व्यक्तीला मेट्रोने अमर्याद प्रवास करता येऊ शकतो.
