स्वार्थासाठी एआयची मदत … अरेरे, काय दिवस आलेत उबाठवर, शीतल म्हात्रे यांची खोचक टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : नाशिकमध्ये शिवेसना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा झाला. या मेळ्याव्यात दाखविण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एआयच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषण ऐकवण्यात आले. यावर टीका होत आहे. स्वार्थासाठी एआयची मदत … अरेरे, काय दिवस आलेत उबाठवर अशी खोचक टीका शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे.
( AIs help for selfishnessOh mywhat a day it has been Sheetal Mhatres scathing criticism)

बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषणात
भाजपाबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवरही टीका करण्यात आली. आता त्यावरून महायुतीकडून उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यात येत आहे. शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत, ठाकरे पिता-पुत्रांना स्वार्थासाठी आता एआयची मदत घ्यावी लागत असल्याची टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कधीच Artificial नव्हते तर ते Original होते… हतबल, हताश आणि अस्तित्वहीन होत चाललेल्या उबाठाने नाशिक मधून जो व्हिडिओ दाखविला तो बाळासाहेबांचा आणि त्यांच्या विचारांचा अपमान आहे… या कर्तृत्वहिन बाप बेट्यांना आता स्वतःच्या स्वार्थासाठी AI ची मदत घ्यावी लागतेयं … अरेरे, काय दिवस आलेत उबाठा वर.

एआयचा वापर करून एका व्हिडीओच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकविण्यात आले. या भाषणातून भाजपा तसेच शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली होती. ‘आपली शिवसेना व्यापाऱ्यांनी तोडली. संभाजी महाराजांसारखेच स्वकियांचे वार आपल्या नशिबात आले. परंतु घाबरू नका. गद्दारांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. शिवसेना संपवण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी ती संपणार नाही. तुमचे शंभर बाप खाली आले तरी शिवसेना संपणार नाही. अशा आव्हानांमधूनच शिवसैनिक पुढे जाईल, असा विश्वास निर्माण करतानाच, मी अजूनही तुमच्या सोबतच आहे…, असे भावनिक आवाहनही बाळासाहेबांच्या आवाजातून करण्यात आले होते.