विशेष प्रतिनिधी
पुणे: खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचा कांगावा करून तसेच त्याबद्दल समाज माध्यमांत खोटी माहिती पसरवली. तसेच लोकांना जमा करून त्यांच्या खोट्या सह्या घेऊन याबाबत निवेदन तयार करणाऱ्याविरुद्ध पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी खडक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात याला आहे. ( Crime against those who tarnish the image of the police force by spreading false information on social media)
ललित सत्यवान ससाणे (रा. भवानी पेठ आणि धनकवडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
ससाणे याने ८ जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास लोहियानगर परिसरात लोकांचा जमा केले. पोलीस दलाची प्रतिमा व्हावी यासाठी लोकांसमोर आपल्याविरुद्ध पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा कांगावा केला. त्यानंतर जमलेल्या लोकांच्या खोट्या सह्या घेऊन याबाबत एक निवेदन तयार केले.
फिर्यादी यांनी त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहे अशी खोटी माहिती आरोपीने वारंवार समाज माध्यमात टाकली. अशी माहिती टाकून आरोपीने नागरिकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा तसेच त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच आरोपीने पोलीस दलात अस्वस्थता निर्माण करणारी माहिती पसरवली.
फिर्यादी यांना त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि त्यांच्यावर दडपण आणण्यासाठी आरोपीने ‘फिर्यादी त्याचा पाठलाग करीत आहेत’ अशी खोटी माहिती ११२ डायल प्रणालीला तसेच फिर्यादी यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांना दिली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी ससाणे यांच्याविरुद्ध पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक लोंढे तपास करीत आहेत.
