दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्फोटात आठ जण ठार, 7 गाड्या उद्ध्वस्त

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले. स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नाही, परंतु त्यानंतर दिल्ली, मुंबई, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ( Eight killed 7 vehicles damaged in blast near Red Fort in Delhi)

गेल्या 3 दिवसांमध्ये पोलिसांनी कारवाई करून तीन दहशतवाद्यांना पकडले होते. त्यांच्याकडून 365 किलो स्फोटके त्याचबरोबर काही विषारी द्रव्ये जप्त केली होती. दहशतवाद्यांचे कनेक्शन पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्याबरोबरच चीनशी सुद्धा असल्याचे आढळून आले.
या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दिल्लीतल्या लाल किल्ल्यापाशी मेट्रो नंबर एक गेटवर एका कार मध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला त्या स्फोटाच्या हादऱ्याने आजूबाजूच्या 6 गाड्या उद्ध्वस्त झाल्या. जवळ असलेल्या दुकानांच्या आणि इमारतींच्या काचा फुटल्या. सुरुवातीला हा स्फोट केवळ सिलेंडरचा असल्याचे वाटले होते परंतु झालेले नुकसान आणि त्याआधी घडलेल्या घटनाक्रम पाहता दिल्लीत दहशतवाद्यांनी कारमध्ये स्फोट घडवून आणल्याचा संशय गडद झाला.

अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळावर ताबडतोब दाखल झाले. लाल किल्ल्यापाशी गर्दी असणाऱ्या ठिकाणांपासून वाहतूक इतरत्र वळविली. त्याचबरोबर तिथे फॉरेन्सिक टीम दाखल झाली या टीमने स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या गाड्यांची तपासणी सुरू केली. या स्फोटाची आणि त्या आसपासच्या घटनांची अधिकृत माहिती पोलिसांनी किंवा सरकारी यंत्रणांनी अजून जाहीर केलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *