अवैध दारूचे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत : देवेंद्र फडणवीस


‘अवैध दारूचे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत. जिथे जिथे गैर प्रकार होतील, तिथे तिथे कारवाई करू.’ असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केले. अंबेजोगाई येथे अवैध दारूच्या संदर्भात घडलेल्या घटनेविषयी पोलिस निरीक्षक निलंबन आणि पोलिस उपअधीक्षकाची अकार्यकारी पदावर बदली करण्याचे निर्देश देखील यावेळी फडणवीस यांनी दिले आहेत.



आंबेजोगाई येथे धाड मारण्यात आल्यावर मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा सापडला. इतक्या मोठ्या प्रमाणावर साठा करणे कुठल्या आंतरिक मदतीशिवाय शक्य नाही, त्यामुळे याच्यामध्ये तेथील प्रशासनाचा हात देखील असला पाहीजे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याविषयीच आजचा हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.



“तसेच जागा मालकाला देखील यात हात आहे का याचा तपास व्हायला हवा, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर रेंटवर जागा देण्यात आली, त्यामुळे त्यांना हे माहीत असणार कि येथे अवैध कारभार चालतो.” असे देखील यावेळी फडणवीस म्हणाले. आणि तसं तर सदनात कोणाला निलंबित करण्यात येत नाही, मात्र विशेष परिस्थितीत पोलिस निरीक्षक यांचे निलंबन करण्यात आले आहे, आणि पोलिस उपअधीक्षक यांची अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

सदनात घेण्यात आलेला हा मोठा निर्णय आहे, तसेच असे जिथे जिथे होईल तिथे तिथे कठोर कारवाई करण्यात येईल असे फडणवीस यांनी आज ठामपणे सदनात सांगितले आहे. यासंदर्भात आता पुढे काय होते, हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.