आज सकाळ पासून संपूर्ण देश अर्णब गोस्वामी बद्दल चर्चा करण्यात गुंग आहे. पुन्हा एकदा अर्णब गोस्वामी आणि पोलिस यांच्यातील दंद्व दिसून आला आहे. आज सकाळी २०१८च्या एका केस अंतर्गत अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली, ती देखील त्यांच्या घरात घुसून. या घटनेचा सर्व बाजूंमधून विरोझ झाला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला ‘आणीबाणीची मानसिकता’ असे म्हटले आहे.
ते ट्विटर वर लिहीतात, आणीबाणी १९७७ मध्ये लागली होती, मात्र ती मानसिकता आजही जीवंत आहे. आणीबाणी लावणारे आणि त्याचे समर्थन करणारे काँग्रेस आणि शिवसेना याच मानसिकतेचे प्रदर्शन करत आहेत.” ते पुढे असेही म्हणतात कि, “अर्णब गोस्वानीने काँग्रेसच्या प्रत्येक वाईट हेतूला जगापुढे आणले आहे. आणि आज तो त्याचीच किंमत चुकवतोय. टुकडे टुकडे गँगचे संरक्षण कोण करत आहे ? पालघर येथे साधूंच्या मॉबलिंचींग साठी जबाबदार लोकांचे संरक्षण कोण करत आहे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या काही महीन्यात जर आपण बघितले तर अर्णब गोस्वामी यांनी पालघर येथील साधूंच्या मॉब लिंचींग वरुन सरकारला मोठ्या प्रमाणात धारेवर धरले. त्यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या केस मध्ये आपण बघितलेच कि कशा पद्धतीने अर्णब गोस्वामीने मुंबई पोलिसांच्या कामावर प्रश्न उपस्थित करत विविध स्टिंग ऑपरेशन्सच्या माध्यामातून अनेक गोष्टी लोकांसमोर आणल्या. हे उघडच आहे कि अर्णब गोस्वामी हे सरकारच्या अनेक मंसूब्यांविरोधात निर्भीडपणे बोलतात. मात्र तसं करत असताना इतर वेळी अभिव्यक्ति स्वातंत्र्याबद्दल गळा काढणारे लोक, आणि टुकडे टुकडे गँग ला समर्थन देणारे लोक आता का बरं गप्प बसले ?
एकूणच महाराष्ट्राची परिस्थिती सध्या अंधेर नगरी चौपट राजा सारखी झालेली आहे. कोणाचा पायपोस कुणाला नाही, सरकार विरोधात बोलणाऱ्यांना थेट अटक होते. ही विचारसरणी आणीबाणीचीच आहे. महाराष्ट्रात आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे, यात तिळमात्र शंका नाही.
