विधानसभेत फडणवीस गरजले..! सत्तारूढ पक्षाची झाली पळता भुई थोडी…!

विधानसभेचे एकदवसीय हिवाळी अधिवेशन नुकतेच भरवण्यात आले. यावेळेला वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्या, या १० महीन्यात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला. मात्र यावेळी सरकारने केलेल्या कामाचा आढावा घेणाऱ्या पुस्तकावर जेव्हा चर्चा करण्यात आली त्यावेळेला सरकार महाराष्ट्राच्या जनतेकडे कसे दुर्लक्ष करत आहे, हे समोर आले. माजी मुख्यमंंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्राची सद्य स्थिती बघता, महाराष्ट्र सरकारने काय करणं अपेक्षित होतं. आणि त्यांनी काय केलं नाही, याबाबतीत फडणवीस विधानसभेत गरजले, यामुळे सत्तारूढ पक्षाला मात्र पळता भुई थोडी झाल्याचे चित्र माध्यमांवर दिसले.

कोरोना काळात सरकारच्या हलगर्जीपणा पासून ते कारशेडच्या बदललेल्या निर्णयापर्यंत, सरकार विरोधात बोलणाऱ्यांना अटक करण्यापासून ते शेतकऱ्यांचे होणारे हाल यापर्यंत सर्व गोष्टींवर सरकारचे खरे चित्र विरोधी पक्ष नेत्यांनी सगळ्यांसमोर आणले. सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतर या एक वर्षाच्या काळात सरकारने काय केले अशा अर्थाचे एक पुस्तक सरकारतर्फे काढण्यात आले आहे, त्यावर निशाणा साधत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, “या संपूर्ण १० महीन्यांच्या काळात महाराष्ट्रात कोरोनाने थौमान घातले आहे, मात्र सरकारच्या प्रगती पुस्तिकेत 97 व्या पानावर कोरोना! हे का या सरकारचे प्राधान्य? किड्या- मुंग्यांसारखे लोक मृत्यूमुखी पडतात आणि हे म्हणतात कोरोना नियंत्रणात आणला. एकट्या मुंबईत 14,000 अधिक मृत्यू झाले आहेत.”

शेतकऱ्यांच्या पर्श्नावर सरकारला दणका देत फडणवीस म्हटले कि, “ज्या कायद्याविरोधात आघाडी सरकार दिल्लीच्या आंदोलनाला समर्थन देत आहे, तो कायदा महाराष्ट्रात लागू आगे, आणि त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार भाव देखील मिळालेला आहे, मात्प शेतकऱ्यांच्या वेगळ्या समस्या आहेत, त्याकडे हे सरकार लक्ष देत नाहीये. शेतकऱ्यांना या सरकारने काय दिले? बोगस बियाणे ? पूर चक्रीवादळ, अतिवृष्टि, बोंडअळी, कीड कशालाही मदत नाही, हे सरकार पराज्यातील शेतकऱ्यांची काळजी घेत नाही, आणि दिल्लीला समर्थन देतंय याला काय अर्थ आहे?”

जलयुक्त शिवार योजना बंद करण्याबाबत फडणवीस म्हणाले कि, “जलयुक्त शिवार योजना बंद केली. तुम्ही चौकशी करा. आम्ही 5000 गावातील परिवर्तनाची गाथा सांगू.याला पर्याय काय देणार?केवळ अर्थसंकल्पात घोषणा, कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद नाही. असं करून कसं चालेल? केवळ आम्ही सुरु केलेल्या योजना बंद करायच्या हाच उद्येश्य असेल तर याने जनतेचे हाल होतील.”

आरे कारशेडचा प्रश्न हा तुमच्या-माझ्या इभ्रतीचा नाही. हा मुंबईकरांच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहे. सरकारने मुंबईवर सूड उगवू नये, एवढीच माझी विनंती आहे.” असंही ते यावेळी म्हणाले.

एकूणच अनेक महत्वाच्या मुद्यांवर यावेळी फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले, ज्याची उत्तरे सत्तारूढ पक्षाला देता आली नाहीत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या भाषणात देखील हे सरकार आणि या सरकारचा मुख्यमंत्री किती कमकुवत आहे, हे लक्षात आले. महाराष्ट्रात सरकार बदलले आणि महाराष्ट्राच्या विकासाला गळती लागली.

सत्ता कदाचित ओरबाडून घेता येईलही, मात्र जनतेचा विश्वास कसा टिकवू शकाल असा प्रश्न आज सामान्य जनता सरकारला विचारते आहे. एकूणच विधानसभेच्या सत्रातून पुन्हा एकदा सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *